Thursday, December 7, 2023
Homeचंद्रपूरहंसराज अहिर यांच्या मध्यस्तीने 18 दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे

हंसराज अहिर यांच्या मध्यस्तीने 18 दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे

राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची मधस्थी

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

कोरपना – आरसीसीपीएल परसोडा लाईमस्टोन माईन साठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत कंपनी कडून करण्यात येणाऱ्या मनमानी धोरणा विरुद्ध परसोडा येथील प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी मागील अठरा दिवसापासून उपोषण सुरू केले होते. हे उपोषण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या मध्यस्थी नंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मागे घेतले.

कंपनी संदर्भात बारा मागण्या उपस्थित करून सदर उपोषण सुरू होते.यातच काटकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावली जात होती. त्यांच्या प्रकृतीची काळजी लक्षात घेता तुर्तास मायनिग बंद करून लवकरच समोपचाराने कंपनी व प्रकल्पग्रस्त यांची समन्वय बैठक लावून न्याय मागण्या सोडवण्यात येईल. या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले.

 

याप्रसंगी माजी आमदार अड संजय धोटे , माजी आमदार सुदर्शन निमकर , तहसीलदार पी एस व्हटकर , पोलीस निरीक्षक संदीप एकाडे, खुशाल बोंडे , किशोर बावणे , भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, शिवाजी सेलोकर , राजू घरोटे , अमोल आसेकर,दिनेश खडसे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular