News34 chandrapur
चंद्रपूर : वरोरा विधानसभेतील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. येथील शेती ओलिताखाली आली पाहिजे. याकरिता या भागात दिंडोरा प्रकल्पाची सुरुवात केली होती. त्याकाळात या प्रकल्पाकरिता शेतजमिनी देखील अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. परंतु शासनाच्या लालफितीत हा प्रकल्प अडकला आहे. त्यामुळे तात्काळ हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना हा प्रकल्प पूर्ण करण्यास भाग पाडू असे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले आहे.
वरोरा तालुक्यातील दिंडोरा प्रकल्पाकरिता 100 कोटी रुपयांची पुरक मागणी चंद्रपूर पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आलेली होती. यासंदर्भात दिवंगत खासदार बाळू धानोरकर व विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. सत्तातरानंतर हा प्रश्न थंड बस्त्यात पडला. परंतु या अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधून हा विषय मार्गी लावणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्हîाच्या वरोरा तालुक्यातील सोईट दिंडोरा या गावाजवळ 14193 हेक्टर सिंचन क्षमतेचा दिंडोरा बॅरेज या प्रकल्पासाठी स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी पत्र क्र. ३०४९/२०२२ दि- २९-११-२०२२ अन्वेय 100 कोटींची पुरक मागणी केली होती. तसेच पत्र क्र. ३१३५/२२ दि. १५-१२-२०२३ अन्वेय वरोरा, वाणी व हिंगणघाट येथील आमदारांसह उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. परंतु शेतजमीन अधिग्रहित करून देखील हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याकरिता या अधिवेशनात हा प्रश्न लावून शासनाला करण्यास बाध्य करणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.