कायद्याची बाजू घेणाऱ्या ठाणेदारावर ही कसली तक्रार?

News34 chandrapur

ब्रह्मपुरी/चंद्रपूर – जिल्ह्यात सध्या वाहतूक व्यवस्था बेलगाम झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे, त्यावर आता ट्रॅव्हल्स धारकांची मुजोरी कायम आहे, चंद्रपूर शहर असो की ग्रामीण भाग आम्ही कायद्याला न भिणारे अशी स्वतःची ओळख ट्रॅव्हल्स धारक निर्माण करीत आहे, बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्याचा प्रयत्न ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी केला असता उलट त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.

 

रविवारी गडचिरोलीवरून नागपूर कडे जाणारी ट्रॅव्हल्स MH49 AT 3625 ही रेल्वे फाटक बंद असल्याने थांबली होती, रेल्वे फाटक उघडले मात्र ट्रॅव्हल्स धारकाने वाहन एक साईड दाबल्याने इतर वाहनांना जाण्यासाठी मार्ग नव्हता, त्यामुळे रेल्वे फाटक येथे जाम झाला, तितक्यात ब्रह्मपुरी चे ठाणेदार सुधाकर अंभोरे हे आपल्या कुटुंबासहित ब्रह्मपुरी च्या दिशेने येत होते.

 

अंभोरे यांना वाहतूक खोळंम्बली असल्याचे निदर्शनास आल्यावर ते वाहनाच्या खाली उतरले, त्यांनी तात्काळ ट्रॅव्हल्स चालकाला वाहन पुढे नेण्यास सांगितले मात्र चालकाने त्यांना अश्लील शब्दात शिवीगाळी केली, ठाणेदार अंभोरे हे साध्या गणवेशात होते, तरीसुद्धा त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र उलट मुजोर चालकाने त्यांना शिवीगाळ केली.

 

ठाणेदार अंभोरे यांनी ट्रॅव्हल्स पुढे थांबविण्यास सांगितली मात्र चालक त्यांचं ऐकायला तयार नव्हता, अंभोरे यांनी वाहतूक पोलिसाला याबाबत सूचना केल्या, ट्रॅव्हल्स ख्रिस्तानंद चौकात थांबली, आणि ठाणेदारांनी चालकाला शिस्त घडवली.

 

चौकात नेमकं काय घडलं? ठाणेदार अंभोरे काय म्हणाले?

वाहतूक व्यवस्था खोळंम्बली होती, मी त्या चालकाला ट्रॅव्हल्स पुढे नेण्यास सांगितली मात्र मलाच त्याने उलट शिवीगाळी करणे सुरू केले, मी सामान्य नागरिक प्रमाणे त्याच्याशी बोललो मात्र त्याने शिवीगाळी देत उलट उत्तर दिले, मी पोलीस आहे हे त्यांना कळले नाही, पण सामान्य नागरिकांसोबत हे ट्रॅव्हल्स धारक असेच वागत असतील.

 

मी त्यांचं वाहन पुढच्या चौकात थांबविले, तितक्यात वाहनातून खाली उतरताना चालकाला लागले, त्याला वाहतुकीच्या नियमाबद्दल सांगितले. मात्र तो मुजोरी करीत असल्याने त्याला खाकीचा दम दाखवीत कानशिलात लगावली असे प्रत्यक्षदर्शी ने सांगितले.

 

कोण आहे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे?

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक पदी असताना त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घातला होता, अनेक आव्हानात्मक गुन्ह्याचा त्यांनी छडा लावला, शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी असताना सुधाकर अंभोरे यांच्या शिस्तीची चर्चा चहूबाजूने होते, त्यांच्या हद्दीत गुन्हेगार गुन्हा करताना घाबरत होता.

 

गुन्हा कुणी केला तर तो कोणत्या पक्षाचा? किंवा प्रतिष्ठित व्यक्ती नसून तो फक्त गुन्हेगार आहे, अशी कायद्याची बाजू नेहमीच अंभोरे घेत होते, कायद्यापुढे सर्व समान हे वक्तव्य ते नेहमी करायचे.

 

ब्रह्मपुरी मध्ये घडलेला हा प्रसंग अनेकांनी त्यांची चूक दर्शविली मात्र विशेष बाब म्हणजे पोलीस जेव्हा फायबर लाठी ने मारतात तर ते कधी डोक्यावर मारत नाही, अनेकांनी अंभोरे यांनी चालकाला दांडूक्याने मारहाण केली असा उल्लेख बातमीमध्ये आला आहे, दांडू पोलीस विभागातून अनेक वर्षापूर्वी हद्दपार झाला, आता फायबर लाठी ने त्याची जागा घेतली आहे.

 

अंभोरे हे वर्दीत नसतानाही आपलं कर्तव्य पार पाडत होते, जिथे चुकते तिथेचं कायदा खुपते, हेच या प्रकरणात घडलं आहे. ट्रॅव्हल्स चालकाने याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे, आता पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गुन्हेगारी नावापुरती उरली आहे, पोलीस निरीक्षक अंभोरे यांची उचलबांगडी लवकर व्हावी या हेतूने ही तक्रार केली अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!