Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडाअल्ट्राटेक-माणिकगड सिमेंट कंपनीची ग्रामीण भागात आरोग्यक्रांती सुरू

अल्ट्राटेक-माणिकगड सिमेंट कंपनीची ग्रामीण भागात आरोग्यक्रांती सुरू

ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

कोरपना – 23-24 नोव्हेंबर 2023 रोजी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड , युनिट – माणिकगढ सिमेंट वर्क्स तर्फे नंदाप्पा आणि मरकागोंडी ग्रामपंचायत मधील नंदाप्पा, मरकागोंडी, माताडी आणि गोंडगुडा गावात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 270 पुरुष, महिला आणि लहान मुलांची तपासणी करीत त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते.

 

विविध आरोग्य विकार तपासले गेले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी माणिकगड तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माणिकगड युनिट हॉस्पिटलच्या प्रभारी डॉ.सौ.रुपाली यादव व त्यांच्या संघाने शिबीर यशस्वी केले. यासोबतच चंद्रपूर येथील टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील डॉ. सूरज, डॉ. ट्विंकल आणि त्यांच्या संपूर्ण संघाने कर्करोग, रक्तदाब आदी आजारांवर निदान केले.

 

रोगांचे निदान करून ग्रामस्थांना सल्ला देण्यात आला. शिबिरादरम्यान सर्व ग्रामस्थांची विविध प्रकारे चाचणी करण्यात आली तसेच गरोदर महिलांचीही तपासणी करून त्यांना योग्य ते समुपदेशनही करण्यात आले. विविध सहाय्यक कर्मचारी आणि माणिकगढच्या डॉक्टरांच्या पथकाद्वारे तपासणी केल्यानंतर औषधांचे मोफत वाटप करण्यात आले आणि पुढील उपचार आवश्यक असलेल्या आजारांसाठी रुग्णांना योग्य सल्लाही देण्यात आला.

 

 

या मोफत वैद्यकीय शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. डॉ.रुपाली यादव यांनीही महिलांमध्ये निरोगी शरीर आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व याविषयी ग्रामस्थांचे ज्ञान वाढवले. या कार्यक्रमात पंचायतीचे नागरिक, आघाडीच्या कार्यकरत्यांनी सहभाग घेतला तरया शिबिराला यशस्वी करण्याकरिता माणिकगड सी. एस.आर. च्या संघाने अथक प्रयास केलेत.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!