News34 chandrapur
चंद्रपूर : घोडाझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना अतिशय वेदनादायी असून या कुटुंबियांना विशेष बाब तत्वावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत त्वरित निधी देण्याचे आदेश दिले. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याहस्ते मृतकाच्या कुटुंबियांना धनादेश दिले.
वरोरा तालुक्यातील शेगाव येथील जहागिर गजानन झाडे, वय-27 वर्ष , मनिष भारत श्रीरामे, वय-32 वर्ष, चेतन भिमराव मांदाडे, वय- 21 वर्ष, संकेत प्रशांत मोडक, वय-25 वर्ष मौजा- गिरोला असे मृत युवकांची नावे आहेत.
वरोरा तालुक्यातील शेगांव येथील 04 युवकांचा ब्रम्हपुरी तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडून दु:खद मृत्यु झालेला होता. सदर प्रकरणात आर्थिक मदत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी वरोरा कृ ऊ बा माजी सभापती राजेंद्र चिकटे, वरोरा पं स. माजी उपसभापती विजय आत्राम, नायब तहसीलदार काळे, मंडळ अधिकारी अजय निखाडे, महादेव कोटकर, चंदूभाऊ जयस्वाल, संजय कोटकर, गोलू वाढई, ग्राप सदस्य शेगांव दिवाकर मेश्राम, प्रभाकर घोडमारे व शेगांव ग्रामस्त उपस्थित होते.