घुग्घुस येथे हायवा ट्रक ला भीषण आग

News34 chandrapur

चंद्रपूर/घुग्घुस – घुग्घुस येथे कोळसा भरून येत असलेल्या ट्रक ला 21 डिसेंम्बरला रात्री 12 वाजे दरम्यान भीषण आग लागली, या आगीत हायवा ट्रक चे मोठे नुकसान झाले आहे.

 

HRG ट्रान्सपोर्ट कंपनीचा हायवा ट्रक क्रमांक MH34 BZ0588 हा वेकोली वणी क्षेत्राच्या कोलगाव कोळसा खाणीतून कोळसा भरून घुग्घुस कडे येत होता, मात्र बैरम बाबा मंदिर परिसराजवळ ट्रक पोहचताच शॉर्ट सर्किट झाला आणि ट्रक ला भीषण आग लागली.

 

सुदैवाने वाहन चालक वेळीच बाहेर निघाल्याने जीवितहानी टळली, घुग्घुस पोलिसांना याबाबत माहिती त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले मात्र आगीत ट्रक चे मोठे नुकसान झाले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!