अजून किती जीवतोडुन सांगणार?

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुरात नुकतीच ओबीसी परिषद पार पडली मात्र या परिषदेतून एका स्वयंघोषित व स्वतःला ओबीसी नेता म्हणणाऱ्याच्या अस्तित्वाची धडपड दिसून आली.

 

मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती, त्यानंतर ओबीसी समाज जागृत झाला, अनेकांनी विरोधही केला, यामध्ये जरांगे पाटील यांचा विरोध करणाऱ्यात अग्रेसर राष्ट्रीय ओबीसी महासंघ राहिला.

 

जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसी संघटनांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले, चंद्रपुरात सुद्धा अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलनाच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी स्वतःला ओबीसी नेते म्हणजेच स्वयंघोषित असलेल्यांनी हजेरी लावली, आंदोलनाच्या मध्ये हे ओबीसी नेते मंडपाजवळ सुद्धा भटकले नाही.

 

यामुळे अनेक ओबीसी समाजातील नेत्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती, फक्त चमकोगिरी साठी ओबीसी चा वापर करायचा आता हेच काम या नेत्याला उरले आहे.

 

ओबीसी परिषदेनंतर विविध ठराव घेण्यात आले होते, मात्र ते ठराव कुणी मांडले? कुणाचं कुणी अभिनंदन केले? ओबीसी प्रवर्गातील विविध प्रतिनिधी आले मात्र त्यांचं नाव कुठेही आले नाही, म्हणजेच ते नाव नसलेले प्रतिनिधी होते काय? कारण ओबीसी परिषदेच्या प्रेसनोट मध्ये फक्त एकंच नाव होतं, बाकी कोण आलं कोण गेलं याचा काही एक उल्लेख त्यामध्ये नव्हता हे विशेष.

 

एकीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ शासनजवळ आपली मागणी विविध माध्यमातून पोहचविताना दिसतो मात्र दुसरीकडे आपल्या प्रांगणाच्या आतून हे स्वयंघोषित ओबीसी नेते आपला आवाज चार भिंतीच्या आत वाजविण्याचे काम करीत असतात.

 

चंद्रपुरातील या स्वयंघोषित ओबीसी नेत्याची वाहवा काही निवडक लोक करताना दिसून येतात, मात्र खरे ओबीसी आपल्या समाजासाठी धडपडत आहे, आज मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्र होत आपली ताकद दाखवीत आहे मात्र ओबीसी मधील काही अपवाद वगळता आपण आपल्या समाजात कसे श्रेष्ठ आहो हे सिद्ध करण्यासाठी हे स्वयंघोषित धडपडत आहे.

 

ओबीसी परिषद झाली, ठराव मांडले, त्याची प्रत उपमुख्यमंत्री यांना दिली त्यावेळी फक्त एकच नेता ही परत देताना दिसला, म्हणजेच फक्त नावासाठी ओबीसी समाजाचा वापर करायचे अशी पद्धत सध्या सुरू आहे, मात्र तुम्ही कितीही जीव तोडून सांगितले तरीही खरे ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.

 

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!