News34 chandrapur
चंद्रपूर – वाढदिवसाच्या बॅनर वरून ban evm हा संदेश नागरिकांना देण्याचे काम गावतुरे दाम्पत्यानी केल्याने सदर बॅनर ची जिल्हाभरात चर्चा होती, मात्र गावतुरे यांच्या वाढदिवशी बॅनर काढल्याने आता विविध चर्चा रंगल्या आहे.
डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या वाढत्या राजकीय वजनाला घाबरून सूडबुद्धीने पालकमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर हटविले व स्वतःचे बॅनर लावले
क्रीडा महोत्सवाचे बॅनर काही दिवसापासून लागलेले असताना 21 तारखेलाच बल्लारशाच्या नगरपालिकेतून एक नोटिफिकेशन काढून 22 तारखेला लागलेले डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर फक्त काढणे म्हणजे डॉक्टर अभिलाष गावतुरे यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका पालकमंत्र्यांनी घेतला की काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला असेच वाटते.
आणि क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने जनतेच्या कराच्या पैशाची उधळपट्टी करत स्वतःच्याच जाहिरातीचे मोठ्या मोठ्या फोटोचे फलक जिल्हाभरामध्ये झळकावणे ही मोदी स्टाईल सुद्धा जनमानसामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
बॅनर वर केवळ स्वतःचेच नाही तर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे व भाजपाच्या बोधचिन्ह कमळाचे फोटो लावलेले आहेत जसा काही हा सरकारी क्रीडा मंत्रालयाचा कार्यक्रम नसून भाजपाचा एक कार्यक्रम आहे. भूमिपुत्र ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याच्यामुळे प्रचंड रोष आहे आणि तो ते बॅनर पुन्हा काढूही शकत होते पण पालकमंत्री या संविधानिक पदाचा मान राखत त्यांनी असे असंवैधानिक काम न करण्याचे ठरवले
पण यानिमित्ताने आपल्या विरोधातला दणकट उमेदवार कोण आहे याची घोषणा तर पालकमंत्री तर करीत नाही ना ? असे भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.