News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील तुकुम येथे 30 डिसेंम्बरच्या रात्री मुक्ताई इलेक्ट्रिकल च्या दुकानाला भीषण आग लागली, आग इतकी भयावह होती की बाजूच्या 2 दुकानात आगीने शिरकाव करीत लाखोंचे नुकसान केले.
नवं वर्षाच्या स्वागतासाठी चंद्रपूर शहरातील नागरिक सज्ज झाले आहे, नव्या वर्षात नवे संकल्प घेत नागरिक पुढच्या वर्षाच्या योजना आखत आहे मात्र या आनंदाच्या क्षणी तुकुम भागात दुकानाला आग लागल्याने दुकान चालकांच्या नव्या वर्षाच्या संकल्पावर विरजण पडले.
30 डिसेंम्बर च्या मध्यरात्री बँक ऑफ महाराष्ट्र जवळील मुक्ताई इलेक्ट्रिकल च्या दुकानात अचानक शॉर्ट सर्किट झाला हळुवार पणे घडलेला हा प्रसंगाने काही वेळात रौद्र रूप धारण केले होते.
सदर दुकानात टीव्ही, पंखा असे विविध दुरुस्तीचे कामे केल्या जातात, बाजूला रिवाईंडिंग व चष्म्याची दुकान आहे, या आगीत तिन्ही दुकानाचे लाखोंचे नुकसान झाले, नागरिकांनी वेळेवर अग्निशमन दलाला पाचारण केल्याने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, यावेळी रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, नागरिकांनी सुद्धा याठिकाणी गर्दी केली होती.
आगीवर नियंत्रण मिळविताना एमएसईबी ने काही वेळ परिसरातील विद्युत पुरवठा बंद केला होता.