चंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू

News34 chandrapur

चंद्रपूर – सावली वनपरीक्षेत्रातर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द) उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज. वन बीटात कंपार्टमेंट नंबर २०१ मधील रामदास देवतळे सामदा बुज यांच्या अतिक्रमित शेतात सोमवार २५ रोजी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. मागील दीड महिन्यात वाघाचा हा 7 वा मृत्यू आहे.

 

घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनपरीक्षेत्राचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी राजूरकर आणि व्याहाड खुर्द उपवन क्षेत्राचे अतिरिक्त क्षेत्र सहाय्यक आर.जी. कोडापे व त्यांच्या चमुने घटनास्थळ गाठून वाघाच्या मृतदेहास ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केले. सदर वाघ ही मादी असून 1 वर्षाची आहे, शवविच्छेदन केल्यावर नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया वनविभागाच्या वतीने देण्यात आली असून उत्तरीय तपासणी नंतर सर्व स्पष्ट होणार.

 

मृतावस्थेत आढळून आलेले वाघाचे शवसडलेल्या अवस्थेत आहे. कदाचित या वाघाचा मृत्यू तीनचार दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 

दीड महिन्यात सात वाघांचा मृत्यू – पहिली घटना चिमूर वनपरिक्षेत्रात 14 नोव्हेम्बरला 2 वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला होता त्यानंतर 18 नोव्हेम्बरला ताडोबा नैसर्गिकरित्या मृत्यू, 10 डिसेंबर ला वरोरा वनपरिक्षेत्रात अपघातात वाघाचा मृत्यू, 14 डिसेंबर पळसगाव येथे नैसर्गिकरित्या मृत्यू, 21 डिसेंम्बरला विजेचा धक्का लागून सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू झाला, 24 डिसेंबर ला शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला ही घटना तळोधी वनपरिक्षेत्रात घडली आज 25 डिसेंम्बरला सावली वनपरिक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!