News34 chandrapur
चंद्रपूर – देशात अन् राज्यात राजकारणात मोठी उलथापालथ होतांना कायमच आपल्याला दिसते.अशातच शिवसेना ऊबाठा गटातील नेतृत्वावर विश्वास ठेवत चंद्रपुरात युवकांची मोठी फळी युवासेनेत प्रवेश करतानाचे चित्र दिसत आहे.
चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे विक्रांत सहारे यांनी घेताच त्यांनी युवकांची मोठी फळी चंद्रपुरात तयार केली, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात विक्रांत सहारे हे पक्ष संघटन बांधणीत आगेकूच करीत आहे.
आज दिनांक २५ डिसेंबर २०२३ शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे व प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व युवासेनेचे शिवा मिलिंद वझरकर, शाहबाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य युवकांनी युवासेनेत प्रवेश केला.
येत्या काळात चंद्रपुरात शिवसेनेच्या उबाठा गटाला युवकांच्या माध्यमातून बळ मिळतांना नक्कीच दिसेल.