Thursday, February 29, 2024
Homeचंद्रपूरतुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल - अनिल देशमुख

तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

आधी आपला विधानसभा क्षेत्र सांभाळा, आम्ही सक्षम - नितीन भटारकर

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व राजीव कक्कड यांना जोरदार टोला लगावत चंद्रपूर मनपा निवडणूक लढावी अशी विनंती केली, निवडणुकीत उभे झाल्यास जनता तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असे ही आव्हान यावेळी देशमुख यांनी केले.

 

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित झालेले माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला केला, मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत चंद्रपुरातील 2 पदाधिकारी हे अजित पवार गटात गेले असून त्याचा आपल्या पक्षावर परिणाम पडला का या प्रश्नावर अनिल देशमुख यांनी दोन्ही पदाधिकारी नितीन भटारकर व राजीव कक्कड यांच्यावर मिश्किल टोला लगावत दोघांनी स्वतः मनपा निवडणुकीच्या मैदानात उभे रहावं, जनता तुमचं डिपॉझिट जमा केल्याशिवाय राहणार नाही, असे न झाल्यास मी जे बोललो ते खोटं असं समजावे.

 

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातून अजित पवारांनी काढता पाय घेत वेगळा गट स्थापन करून ते शिंदे-भाजप सरकारमध्ये गेले, त्यानंतर चंद्रपुरातील युवक कांग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर व शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देत त्यामध्ये सामील झाले होते.

 

अनिल देशमुख यांच्या आव्हानाला उत्तर देत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी उत्तर देत म्हटलं आहे की, अनिल देशमुख हे जेष्ठ नेते आहे त्यांचा आम्ही आदर करतो, आम्ही जर निष्क्रिय असतो तर पक्षातील 90 टक्के कार्यकर्त्यांचा आम्हाला पाठिंबा नसता, आपण राज्याचे जरी नेते असले तर स्वतःच्या विधानसभा मतदार संघातील नगर परिषदेवर राष्ट्रवादी कांग्रेसचा झेंडा फडकविण्यास अयशस्वी का ठरले? त्याचं कधी चिंतन केलं का? विशेष म्हणजे मंत्री असताना सुद्धा कधी नागपूर जिल्हा परिषद व नगर परिषदेवर ते अयशस्वी का ठरले याबाबत त्यांनी आधी विचार करावा.

 

आम्ही मनपा निवडणूक लढावी असा त्यांचा आग्रह आहे, याआधी त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात लक्ष द्यावे चंद्रपुरातील राजकारण सांभाळायला आम्ही सक्षम आहो.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular