News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल:- शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत शासनाने ३० नोव्हेंबर पर्यंतच दिलेली होती. ती मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्याची मागणी मूल कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती राकेश रत्नावार यांनी जोर धरून लावली होती. त्यांनी शासनाला निवेदन देऊन सदर मागणी मागताच शासनाने शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली.
एकीकडे शेतकऱ्यांवर आकस्मिक अवकाळी पावसामुळे धान कापणी खोळंबली. काही शेतकऱ्यांचे धान कापून ठेवल्यामुळे पाण्यात भिजून खराब झाले. अशातच ओल्या झालेल्या धान्याला कमी भाव मिळेल व व्यापारी ते धान खरेदी करणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले होते.
अवकाळी पावसामुळे ओले धानाचे पीक वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन नोंदणी करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. शेतकऱ्यांची ही अडचण समजून राकेश रत्नावार यांनी शासकीय आधारभूत धान नोंदणीची तारीख वाढवण्याबाबत निवेदन दिले होते तसेच मागणी जोर धरून लावली होती. याचा विचार करून शासनाने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदतवाढ दिलेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करावी असे आवाहन राकेश रत्नावर यांनी केले आहे.