News34 chandrapur
चिमूर – अफरातफर करणाऱ्या व्यक्तीची जप्त केलेल्या मालमत्तेचा त्वरित लिलाव करून खातेदारांची रक्कम परत करण्यासंदर्भात अन्याय निवारण समितीचे वतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था चिमूर येथे पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे. व्यवस्थापक मारोती पेंदोर, लिपिक अमोल मेहरकुरे. दैनिक संकलक अतुल मेहरकुरे यांनी करोडो रुपयांची अफरातफर केली होती. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही अफरातफर करणारे व्यक्तीवर कुठलीच कारवाई होत नव्हती. अखेर कर्मचारी व खातेदार यांनी अन्याय निवारण समितीचे माध्यमातून साखळी उपोषण सुरू केल्याने आंदोलनाची दखल घेत आरोपींना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त केली.
पण ती लिलावात न काढल्यामुळे खातेदारांचे ठेवी परत करता येत नसल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचे प्रशासक रा.सू. लांडगे संस्थेचे कर्मचारी व अन्याय निवारण समितीचे सर्व सदस्य यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन संस्थेमध्ये अफरांतफर करणाऱ्या व्यक्तीची जप्त करण्यात आलेली मालमत्ता त्वरित लिलावात काढून खातेदारांची देणे असलेली रक्कम त्वरित मिळावी या करिता निवेदन देण्यात आले.