News34 chandrapur
चंद्रपूर/जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बाबापुर येथे चंद्रपूरच्या कैलास ने भव्य असा कोंबडा बाजार थाटला, त्याबाबत News34 ने वृत्त ही प्रकाशित केले होते, 4 दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेने कोंबडा बाजारावर धाड मारली मात्र ही कारवाई नाममात्र असल्याची चर्चा आता जोरात रंगली आहे. विशेष बाब म्हणजे या धाडीत बाजाराला कारणीभूत असलेल्या 5 कोंबड्याना अटक करण्यात आली आहे.
चंद्रपुरातील सट्टा किंग म्हणून नामवंत असलेल्या कैलास ने काही सहकाऱ्यासोबत जिवती येथील पहाडावर कोंबडा बाजाराचा भव्य असा संसार थाटला.
कैलास ने चंद्रपुरात सट्टा या कौशल्यपूर्ण खेळात गुणवत्ताप्राप्त कामगिरी केल्यावर सरळ महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील भारी, बाबापुर येथे कोंबडा बाजार सुरू केला, याठिकाणी रमी, कट पत्ते, झेंडी-मुंडी असे विविध मैदानी खेळ (लुप्त झालेले) खेळण्यात येत होते.
एका डावाची नाळ म्हणून कैलास दररोज लाखो रुपये कमवत आहे, याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यावर सुद्धा पोलिसांना याचा सुगावा लागला नाही, बुधवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपल्या प्राणाची बाजी लावत (सायंकाळी सर्व खेळाडू घरी गेल्यावर) धाड मारली, मात्र यावेळी अनेक चारचाकी वाहने व खेळाचा मुख्य नायक कैलास तिथे उपस्थित होता त्यांना अटक न करता वारंवार कायदा व सुव्यवस्था भंग करणारे व त्या बाजारात भांडणारे कोंबड्याना काही निष्पाप लोकांसहित अटक करण्यात आली, ही कारवाई म्हणजे मी मारल्या सारख करतो तू रडल्यासारखं कर अशी होती.
या कोंबडा बाजारातील मुख्य आरोपी (कैलास वगळता) बाजारात भांडणारे कोंबडे होते की काय ? अशी अवस्था अटक केल्यावर कोंबड्याची झाली, अटक कारवाई नंतर त्या कोंबड्यांचे काय झाले असेल? (कुणाच्या पोटात तर गेले नाही न?) असा प्रश्न इथे उपस्थित होतो. विशेष म्हणजे दिवसभर सुरू असलेल्या या बाजारावर सायंकाळी कारवाई का करण्यात आली?
भांडणाऱ्या कोंबड्यानी पोलिसांना वारंवार चकमा दिला मात्र अखेर ते पोलिसांच्या हाती लागलेच, पण हा कोंबडा बाजार पुन्हा सुरू होणार आहे हे नक्की, कारण कैलास अभि जिंदा है !
सदर कारवाई नाममात्र आहे याबाबत News34 जवळ सबळ पुरावे आहे, बातमीच्या पुढील भागात कैलासचा तो वजनदार साथीदार कोण? त्याबाबत महत्वाचा खुलासा….वाचत रहा….. News34