Monday, February 26, 2024
Homeचंद्रपूर ग्रामीणचंद्रपूर तालुक्यात घडली दुःखद घटना, आनंदाच्या वातावरणात असलेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

चंद्रपूर तालुक्यात घडली दुःखद घटना, आनंदाच्या वातावरणात असलेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

2 दिवसात मृतक युवक वेकोली मध्ये होणार होता रुजू

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर/घुग्घुस – 2 दिवसांनी तो वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये रुजू होणार होता मात्र त्यापूर्वीचं त्या युवकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, ही घटना 13 डिसेंबर ला घुग्घुस येथे घडली.

 

13 डिसेंबर बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास 20 वर्षीय स्मित श्याम पगडी हा युवक आपल्या मित्रांसोबत चारचाकी वाहन क्रमांक MH29BC 8276 ने बेलोरा कडे जात होता, वाहनाचा वेग जास्त असल्याने अचानक वाहनावरून स्मित चे नियंत्रण सुटले आणि वाहन वेगात झाडाला आदळले, या अपघातात स्मित पगडी चा जागीच मृत्यू झाला.

 

स्मित ला वडिलांच्या जागी वेकोली मध्ये नोकरी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते मात्र स्मित चा अपघाती मृत्यू झाल्याने आता कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

 

सदर घटनेचा पुढील तपास घुग्घुस पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular