चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर

News34 chandrapur

चंद्रपूर:- चंद्रपूर/गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामिण सेवक विविध मागण्या करीता मंगळवारपासून बेमुदत संपावर असून अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियन संघटना नई दिल्ली यांच्या आदेशा नुसार संप आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

 

प्रमुख मागणी याप्रमाणे ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांना ८ तास काम,पेन्शन सह सर्व नियमित कर्मचाऱ्या प्रमाणे 12, 24 ,36 नुसार वेतन वाढ लाभ, कमलेश केंद्र कमिटीचा रिपोर्ट सकारात्मक शिफारशी लवकर लागू करणे. गटविमा पाच लाख पर्यंत वाढविणे, केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे ग्रॅज्युटी सूत्र लावून ग्रॅजुटीमध्ये वाढ करणे, 180 दिवसापर्यंत सुट्टी साठवून त्या सेवानिवृत्तीच्या वेळेस रोखीने देणे, ग्रामीण डाक सेवक च्या कुटुंबांना वैयक्तिक वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध पुरविणे, केंद्रीय कर्मचाऱ्या याप्रमाणे वार्षिक वेतन वृद्धी तपावत दूर करणे, व सर्व शाखा डाक घराना देण्यात येणाऱ्या सर्व सेवांना गतिशील करण्याकरीता लॅपटॉप ,प्रिंटर आणि ब्रॅडबँड नेटवर्क सुविधा प्रदान करणे. यासारख्या विविध मागण्यासाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन न्यू दिल्ली यांच्या निदर्शनानुसार चंद्रपूर /गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामीण शाखाडाक सेवक बेमुदत संपावर गेलेले आहे.

 

जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक युनियनचे पद्माकर टोंगे, मुरलीधर बोडखे,पांडुरंग कोहपरे ,शंकर निवलकर, धोंडू मुसळे, रामदास गोहोकर,राजू धोटे, संदीप डाखरे, सुनील भोपये, समाधान खोब्रागडे, विभा सहारे, भारती करंडे, राजू सातपुते, शिवाजी गंध गुडे, बाबुराव बोंडे, चंदू बोभाटे आधी सह सर्वच ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपात सहभागी झाले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!