Monday, June 17, 2024
Homeग्रामीण वार्ताचंद्रपूर पोलिसांचा संयम सुटला आणि....

चंद्रपूर पोलिसांचा संयम सुटला आणि….

अनेकांवर गुन्हे दाखल, काहींचा शोध सुरू

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

पोंभूर्णा :- धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर झालेल्या मागील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले कलम ३०७ व ३५३ मागे घेण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन पोंभूर्णा पोलिस स्टेशन समोर सोमवार पासून सुरू असलेला ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी ३० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

 

धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व ईको-पार्कमध्ये आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.

सदर आंदोलनात वन विभागाच्या कार्यालयाची तोडफोड सहित पोलीस कर्मचारी व उपविभागीय अधिकारी इंगळे यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली होती, त्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते, आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी थेट पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरू झाले, 2 दिवस पोलिसांनी संयम बाळगला मात्र त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवले.

 

विशेष म्हणजे आदिवासी समाज बांधवांना ठिय्या आंदोलन करण्यासाठी घेऊन आलेले कार्यकर्ते तिथून पळाले होते,

 

बुधवारी दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान प्रकरण चिघळणार असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जुन्या गुन्ह्यातील ४ लोकांना व आंदोलनातील २६ लोकांना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

यावेळी पोलिसांनी ३७ व ईतर २५ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून त्यांचेवर कलम १४१, १४३, १४७,१४९,३४१,३५३,१०९,१८८ व भादवी सहकलम १३५ अन्वये गुन्हे दाखल केले.

पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयातील आंदोलना दरम्यान जगन येलके व ईतर १२ लोकांवर ३०७ व ३५३ व विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यातील चार लोकांना पोलिसांनी आंदोलनस्थळी ताब्यात घेतले.

 

यात गणेश परचाके,दर्शन शेडमाके,कांताबाई मडावी, दिनेश गेडाम यांचा यात समावेश आहे.सदर अटकेतील चारही आरोपींना न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरीत ९ लोकांसहित जगन एलके याना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!