Friday, March 1, 2024
Homeचंद्रपूरचंद्रपुरातील फाउंटेन घोटाळ्यावर पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते व आमदार गप्प का? - पप्पू...

चंद्रपुरातील फाउंटेन घोटाळ्यावर पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते व आमदार गप्प का? – पप्पू देशमुख

फाऊंटेन घोटाळ्याविरोधात जनविकास सेना आक्रमक

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur
चंद्रपूर : शहरातील विविध पाच चौकात फाऊंटेन बांधकाम व उभारणीच्या सव्वादोन कोटीच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर आज 13 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताचे दरम्यान जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकातील महानगरपालिका इमारतीसमोर घोटाळेबाज अधिकाऱ्यांना अटक केल्याचे प्रतिमात्मक आंदोलन करून जोरदार नारेबाजी केली. आंदोलनात सहभागी चार कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून आरोपीप्रमाणे काळा कपडा टाकून त्यांचा चेहरा झाकण्यात आला. अटक केलेल्या सर्व चारही प्रतिकात्मक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात बांधण्यात आले. सर्व प्रतीकात्मक हॉटेल अधिकाऱ्यांना मनपा इमारती च्या पायऱ्यावरून उतरवून शहर पोलीस स्टेशनच्या दिशेने नेण्यात आले.

 

या आंदोलनात मनिषा बोबडे, शोभा यादव, अपर्णा चौधरी, पुष्पा मुळे, माला गेडेकर, किरण कांबळे, निर्मला नगराळे, स्नेहल चौथाले, माया डोईफोडे, दर्शना पाटील, राधिका माणिकपुरी,सचिन आक्केवार, अमुल रामटेके, योगेश निकोडे, राहुल दडमल, गितेश शेंडे, अमोल घोडमारे, प्रफुल बैरम, अरुण येरगुडे, वसंता जाधव, प्रवीण अत्तेरकर, सुनील ढेकले, घनश्याम येरगुडे, देवराव हटवार, इमदाद शेख, सुभाष फुलझेले, प्रफुल सतभये, नरेंद्र लभाने इत्यादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
फाउंटेन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून या घोटाळ्यासाठी जबाबदार आयुक्त बिपिन पालीवाल व इतर संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी जनविकास सेनेची मागणी आहे.

 

आमदार, पालकमंत्री व विरोधी पक्ष नेते आता का बोलत नाही ?

 

धुळीच्या प्रदूषणाने शहरातील नागरिक त्रस्त आहेत. अशातच शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत मनपाला शासनाकडून चार कोटी रुपयांच्या वर निधी प्राप्त झाला. धूळ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी मनपाच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी फाऊंटेन लावण्यासाठी सव्वादोन कोटी रुपयांची निविदा काढली. चौकात फाउंटेन लावून धूळ कमी करण्याचा करण्याचा जावईशोध चंद्रपूर मनपाच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी लावला. आज पर्यंत मनपातील करोडो रुपयांचे जवळपास पंधरा घोटाळे पुराव्यानिशी उजेडात आणले. एकाही घोटाळ्याचे विरोधात स्थानिक आमदार, पालकमंत्री किंवा विरोधी पक्ष नेते आता का बोलत नाही याबद्दल जनतेच्या मनात मोठा असंतोष असल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular