१ जानेवारीच्या फुले दाम्पत्य सन्मान रॅलीत समाज बांधवांनी सहभागी व्हावे – चंद्रकांत बोरकर

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – १ जानेवारी १८४८ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा पुणे येथे मुलीचा पहिली शाळा सुरू केली. त्या सन्मानार्थ भिडेवाडा ते फुलेवाडा महारैली १ जानेवारी २०२४ रोजी माळी महासंघ व सकल माळी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

 

या रॅलीमध्ये समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरुण तीखे यांचे मार्गदर्शनाखाली माळी महासंघाच्या वतीने गत नऊ वर्षापासून या रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.

 

भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणीसह भिडेवाडा ते फुलेवाडा सन्मानदिन महारॅली फुले दांपत्यांच्या सन्मानार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारकाच्या निर्माणाचे सर्व अडथळे दूर होवून येत्या काही दिवसात भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक निर्माणाचे कार्य सुरू होत आहे, माळी महासंघाच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धता म्हणावी लागेल.

 

फुले दांपत्यांच्या सन्मानासाठी तसेच आलेल्या यशाचा जल्लोष करण्यासाठी माळी समाज बांधवांनी या महारॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन माळी महासंघाचे चंद्रकांत बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.एन.एस.कोकोडे, महीला आघाडी कार्याध्यक्ष प्रमुख संध्याताई गुरनूले, डॉ. संजय घाटे, यांनी केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!