चंद्रपूरचे पहिले आमदार श्रीमंत देवाजीबापू खोब्रागडे यांच्या 125व्या जयंतीनिमित्त डाक विभाग करणार विशेष सन्मान

News34 chandrapur

चंद्रपूर – स्वातंत्र्यपूर्व काळात 1937 मध्ये मध्य-वऱ्हाड प्रांताच्या प्रांतिक न्यायमंडळात चांदा-ब्रह्मपुरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे चंद्रपूरचे पहिले आमदार व बल्लारपूरचे पहिले नगराध्यक्ष श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या डाक विभाग तर्फे विशेष आवरण (Special Cover) चे अनावरण करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

 

श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे जयंती महोत्सव समिती, चंद्रपूर व बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर च्या विद्यमाने चंद्रपूरचे पहिले आमदार, बल्लारपूर नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष, चंद्रपूर येथील धम्मदिक्षा समारंभाचे अध्यक्ष, विदर्भातील प्रसिद्ध व्यवसायिक, समाजसेवक श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांची १२५ वी जयंती चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात २ जानेवारी २०२४ रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे साजरी करण्यात येणार आहे.

 

सकाळी ९ वाजता बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे भवन, चंद्रपूर येथे श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणायात येणार आहे. सायंकाळी ४:०० वाजता डाक विभाग भारत सरकारच्या वतीने विशेष आवरण (Special Cover) चा अनावरण सोहळा विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, विमोचनकर्ता शोभा मधाले, पोस्ट मास्टर जनरल, विदर्भ क्षेत्र, नागपूर तसेच श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांची सून सुधा हेमचंद्र खोबरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण हेमचंद्र खोबरागडे राहणार आहेत.

 

त्यानंतर भव्य प्रबोधन सभेत ( ‘भारतातील वर्तमान वाटचाल, एक मूल्यमापन’ ) या विषयावर आंबेडकरी विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार रणजीत मेश्राम, नागपुर व भीमराव वैध (श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे जीवन – एक अवलोकण) यांचे मार्गदर्शन होणार आहे. ह्या कार्यक्रमास ॲड. रामभाऊ मेश्राम व ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

 

स्वागताध्यक्ष मारोतराव पत्रूजी खोबरागडे भूषवतील तर अध्यक्षस्थानी रिपब्लिकन नेते अशोक निमगडे राहातील.
विदर्भातील प्रसिद्ध मोठे व्यापारी असलेले चंद्रपूर जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालणारे श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांनी तन-मन-धनाने संपूर्ण आयुष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसाठी खर्ची घातले त्यांच्या जीवनपटावर आधारित एक चित्रफित दाखविण्यात येणार आहे.

 

श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय कार्य’ या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजीत केली असुन इच्छुक स्पर्धकांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला निबंध पीडीएफ करून दिनांक 31 डिसेंबर पर्यंत 9527580964 व 8698615848 या मोबाईल क्रमांकावर पाठवावे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

 

या पत्रकार परिषदेला किशोर सवाने, प्रतीक डोर्लीकर, दीपक जयसवाल , नंदू नागरकर , रामु तिवारी , सूर्यकांत खनके, बलराम डोडाणी, विजय नळे, पप्पू देशमुख, ॲड. राजस खोबरागडे, डी. के. आरीकर, ॲड. वैशाली टोगे, द्रौपदी काटकर , एम टी साव , संजय डुंबेरे, राजकुमार जवादे , अशोक टेंभरे, शाहीन शेख , पुरणसिंग जुनेजा, हाजी अन्वर अली, अमजद पापाभाई शेख, प्रा. नितीन रामटेके, अवतारसिंग गोत्रा, अॅड. हिराचंद बोरकुटे, अॅड. विजय मोगरे, गोपाल अमृतकर, डॉ. रोशन पुलकर, डॉ. टी.डी. कोसे, अॅड. राजेश वनकर, डॉ. मुकूंद शेंडे , प्रविण पडवेकर, सोहेल शेख, राजूभाऊ खोबरागडे, विशालचंद्र अलोणे, केशव रामटेके, महादेव कांबळे, हरिदास देवगडे, शेषराव सहारे, आर्कि. राजेश रंगारी , दुष्यंत नगराळे, नेताजी भरणे, रमजान अली, जि. के. उपरे, सुरेश नारनवरे, पवन भगत, अॅड. आशिष मुंधडा, तवंगर खान, धर्मेश निकोसे, रामकृष्ण कोंड्रा, जॉन्सन नळे, जमनादास मोटघरे, भाऊराव चांदेकर, वसंत रंगारी, अशोक सागोरे, कैलाश शेंडे, ज्योती सहारे, निर्मला नगराळे, मृणाल कांबळे, गिता रामटेके, योगिता रायपुरे, अल्का मोटघरे, तनुजा रायपुरे, वर्षा घडसे, ज्योती शिवणकर, प्रेरणा करमरकर, पंचफुला वेल्हेकर, अश्विनी आवळे, वैशाली साठे, राजेश्री शेंडे, शिला कोवले, छाया थोरात, अनिता जोगे, अंजली निमगडे, ज्योती निमगडे, लिना खोबरागडे, सुनिता बेताल, पोर्णिमा जुलमे, समता खोबरागडे, पोर्णिमा गोंगले, अशोक फुलझले, शंकर वेल्हेकर, प्रेमदास बोरकर, अनिल अलोणे, सचिन पाटील, प्रदिप अडकिने, विजय करमरकर, माणिक जुमडे, सिध्दार्थ वाघमारे, प्रभुदास माऊलीकर, यशवंत मुंजमकर, वामनराव चंद्रिकापूरे , विशाल चीवंडे, सुधीर ढोरे, सुनिल जुनघरे, हर्षल खोबरागडे उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!