News34 chandrapur
चिमूर – चिमूर नगर परिषद क्षेत्रातील वडाळा पैकु जुन्या वस्तीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नगर परिषदच्या विरोधात नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
नगर परिषद चिमूर, प्रभाग क्र ३/४ मधील, गटारी तुडुंब भरली असून,२ वर्षांपासून नाली उपसा करण्यात आली नाही त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. गटारामध्ये अळ्या, कीटक पडली असून मच्छर चा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे न प चिमूर कडून अजूनपर्यंत दखल घेतल्या गेली नाही ही शोकांतिका आहे.
तसेंच बोरवेल नांदुरुस्त, सर्व,विहीर भोवती काटेरी झाडें व घाण साचली आहे काही विद्युत पथदिवे बंद अवस्थेत आहे, या गंभीर समस्येकडे प्रशासन का लक्ष देत नाही याची खंत वाटते. केवळ कर वसुली करून जनतेला वेठीस धरणे योग्य नाही.
५/६ वर्षपासून दूषित नळ पाणी पुरवठा सुरू असून याकडे सुद्धा दुर्लक्ष आहे. नगर परिषद अखेर काय साध्य करत आहे हे एक कोडच आहे. वडाळा ग्रामपंचायत स्वतंत्र होती तेव्हाच जनतेला सर्व नागरी सुविधा परिपूर्ण मिळायच्या परंतु हल्ली नगर परिषद मध्ये समाविष्ट करून पश्चाताप होत असल्याची नागरिकांना खंत वाटत आहे.