News34 chandrapur
चंद्रपूर : संघटनात्मक बांधणी करून येणाऱ्या निवडणुकीत महिला संघटन अधिक बळकट करण्याकरिता जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर महिला काँग्रेस तर्फे ५१ महिलांची कार्यकारणी जाहीर केली आहे. महिलांनी राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन देखील यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.
याप्रसंगी प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामु तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, ग्रामीण महिला अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, जेष्ठ कामगार नेते के के सिंग, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा शेख, माजी महिला अध्यक्ष चित्राताई डांगे, काँग्रेस नेते महेश मेंढे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, मनीष तिवारी, अनुताई दहेगावकर, प्रीती शहा, राहुल चौधरी, प्रशांत भारती ,शालिनी भगत यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी चंद्रपूर शहर महिला उपाध्यक्ष पदावर वीणा खनके, सकिना अन्सारी, छाया सोनूले, सुनंदा धोबे, अर्चना चिवंडे, संध्या पिंपळकर, एकता गुरले, ललिता रेवल्लीवार, रेखा सुधाकर वैरागडे तसेच चंद्रपूर शहर महिला सचिव पदावर प्रियंका वानखेडे, संगीता पेटकुले, मुन्नी मुमताज शेख, शिल्पा आंबटकर, साधना रामटेके, सुषमा मेश्राम, विद्या गड्डमवार, छबू पोहनकर तसेच चंद्रपूर शहर महिला काँग्रेस महासचिव पदावर शुभांगी भोयर, माया इटनकर, शामीनजी काजी, रेखा भारस्कर, दीपाली वंजारी, जयश्री जाधव, ज्योषना इटनकर, वैशाली किनाके तसेच चंद्रपूर शहर महिला काँग्रेस सदस्य पदावर उषा बल्लावार, रजनी मडावी, वंदना खेडकर, तृप्ती जगनाडे, शीतल गीन्नलवार,
प्रज्ञा बारसागडे, माधुरी देशट्टीवार, अर्चना राजूरकर, निशिगंधा खोब्रागडे, अर्चना धकाते, वैशाली ऐसेकर, स्नेहल अंबागडे, संगीता टवलारकर, नम्रताताई मोरे, कविता बावणे, सुवर्णा भारसकर, संगीता देठे, लीला बुटले, राणी बेलोरकर, उज्वला कार्लेवार, उषा तंगडपल्लीवार, स्वीटी नगराळे, स्नेहा शिरपूरकर, शालिनी काळे, अर्चना पिपरे तसेच चंद्रपूर शहर महिला मार्गदर्शक पदावर चित्रा डांगे, संगीता अमृतकर, सुनीता लोढिया, अश्विनी खोब्रागडे, उषा धांडे, सुनीता अग्रवाल, अनुताई दहेगावकर, शालिनी भगत, काजी, वंदनाताई भागवत यांची नियुक्ती करण्यात आली.