Friday, June 14, 2024
Homeक्रीडाजिल्हा रुग्णालय व चंद्रपूर मेडिकल कॉलेज नागपूर एम्सला टेलीकन्सल्टसिने जोडणार - भारती...

जिल्हा रुग्णालय व चंद्रपूर मेडिकल कॉलेज नागपूर एम्सला टेलीकन्सल्टसिने जोडणार – भारती पवार

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांची पत्रकार परिषदेत माहिती

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एखाद्या गंभीर आजाराच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी नागपूर किंवा अन्य रुग्णालयात न्यावे लागते. यात वेळ आणि पैसाही खर्च होतो. यात अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णाला जिल्हा रुग्णालये किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्या आजारावर उपचार व्हावे यासाठी जिल्हा रुग्णालय आणि चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुरातील एम्सला टेलिकन्सलटन्सीने जोडणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी चंद्रपुरात गुरुवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी डॉ. भारती पवार या गुरुवारी चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यानी शासकीय विश्रामगृहात बैठक घेत आढावा घेतला. काही दिवसांपूर्वी खनिज विकास निधीच्या बैठकीत काही कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आरोग्य क्षेत्राचा समावेश असून, जिल्ह्यातील आरोग्य सेवा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य सुविधांसाठी केंद्रसरकारकडे पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. यानंतर केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून, या निधीतून अनेक कामे केली जात आहे.

 

काही कामे प्रगतीपथावर आहे. या सर्व कामांचा डॉ. भारती पवार यांनी बैठकीत आढावा घेतला.
आरोग्याच्या दृष्टीने भविष्यात जिल्ह्यासाठी आणखी काय सुविधा देता येईल, याबाबत गुरुवारच्या आढावा बैठकीत विचारमंथन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात पीएम रिलिफ फंडातून पहिल्या टप्प्यात २२ कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात १४ कोटींची निधी देण्यात आला अशी माहिती देत उच्चदर्जाच्या लॅबसाठी प्रस्ताव आल्यास त्यासाठी १ कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही डॉ. पवार यांनी दिली. यानंतर वेगवेगळ्या आरोग्य सुविधांसाठी आतापर्यंत जिल्ह्याला ४८ ते ५० कोटींचा निधी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

 

जिल्ह्यातील ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट सुरू करण्यात आले आहे. टेलिकन्सलटन्सीने ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरेाग्य केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जोडण्यात आली असून, काही ठिकाणी असे प्रयोग सुरू आहेत. जिल्ह्यातील १७ लाख लाभार्थ्यांना आयुष्मान आरोग्य कार्ड दिले जाणार असून, ५ लाख लाभार्थ्यांना या कार्डचे वितरण करण्यात आल्याची माहिती देत कोरोणासारख्या कोणत्याही साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी देशाची आरोग्य सज्ज आणि तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

 

पत्रकार परिषदेला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जि.प. सीईओ विवेक जॉन्सन, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!