Monday, February 26, 2024
Homeचंद्रपूरचंद्रपुरात आज रात्री 12 वाजेपर्यंत "ध्वनिक्षेपक वाजणार""

चंद्रपुरात आज रात्री 12 वाजेपर्यंत “ध्वनिक्षेपक वाजणार””

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने विशेष सवलत

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त दिनांक 27 डिसेंबर रोजी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी एका आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्याकरिता सवलत देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्याकरीता सन-2023 मधील राखीव सवलतीच्या दिवसातून ही सवलत मंजूर करण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन व त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असेही जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेशात नमूद आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular