Thursday, June 20, 2024
Homeक्रीडाचंद्रपूर मनपाचा अजब कारभार

चंद्रपूर मनपाचा अजब कारभार

मनपा आयुक्तांनी केली हद्दपार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लागणाऱ्या एलईडी स्क्रीनसाठी चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढली आहे. बल्लारपूर शहरात हा कार्यक्रम होत असतानाही चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढून आपली हद्दपार केली आहे.

दुसऱ्या शहरातील एल.ई.डी. स्क्रिनसाठी चंद्रपूर मनपाने निविदा कशी काढली, असा प्रश्न आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी उपस्थित केला आहे. हि निविदा काढण्यास आम आदमी पार्टीने विरोध दर्शवला असून, चंद्रपूरच्या जनतेचा पैसा इतर ठिकाणी खर्च करण्याचा अधिकार आयुक्त विपीन पालीवाल यांना कोणी दिला, असा सवाल आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी विचारला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मर्जी राखण्यासाठी ही निविदा काढण्यात आली, असा आरोप केला आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी जावक क्रमांक: चंशमनपा/विद्युत्त/२०२३/३१० दिनांक : २२/१२/२०२३ नुसार ई-निविदा सुचना काढली आहे. आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका, जि. चंद्रपूर यांचे वतीने खालील कामासाठी दोन लिफाफा पद्धतीने ई निविदा पद्धतीच्या पंजीबद्ध कंत्राटदाराकडून/फर्मकडुन ई निवीदा मागविण्यात आल्या. निवीदेच्या विस्तृत नमुना महाराष्ट्र शासनाच्या http://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २२/१२/२०२३ पासून पाहण्यास उपलब्ध आहे. ई-निविदा प्रसिद्धीचा तपशील कामाचे नाव चंद्रपुर व बल्लारपूर शहरात ४ एल.ई.डि. स्क्रिन उभारणीचे काम असे दाखविण्यात आले आहे. ऑनलाईन निविदा विक्री व स्वीकृती दिनांक दिनांक २२/१२/२०२३ ते २७/१२/२०२३ ला दु. १२.०० वाजेपर्यंत आणि ऑनलाईन निविदा उघडणी दिनांक दिनांक २८/१२/२०२३ ला दु. ३.०० वाजता असे नमूद आहे. ही जाहिरात एका स्थानिक दैनिकांत देण्यात आली आहे.

 

राईकवार यांनी सांगितले कि, चंद्रपूर महानगरपालिका आणि बल्लारपूर नगरपालिका या दोन स्वतंत्र संस्था आहेत. कोणतेही काम करताना सीमेच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही. परंतु, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी यांनी केवळ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मर्जी राखण्यासाठी हा निविदा काढली. या निविदामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या तिजोरीवर वाढीव खर्च होणार आहे. त्यामुळे अवास्तव खर्च टाळण्यासाठी ही निविदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी राईकवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!