Thursday, February 29, 2024
Homeचंद्रपूरआमदार निधीचा वापर नागरिकांच्या हितासाठी, मोठ्या इमारती व बगीचे बांधण्यात नाही -...

आमदार निधीचा वापर नागरिकांच्या हितासाठी, मोठ्या इमारती व बगीचे बांधण्यात नाही – आमदार किशोर जोरगेवार

वडगांव येथील अभ्यासिकेच्या इमारतीचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूरातील विद्यार्थी प्रतिभाशाली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याने भरारी घेतली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. आपण मतदार संघात ११ अभ्यासिका तयार करत आहोत. यातील आज दुस-या अभ्यासिकेच्या इमारतीचे लोकार्पण झाले आहे. अभ्यासा बरोबरच त्यांना विचारांची देवाण – घेवाण करता यावी, आपले अनुभव दुस-या विद्यार्थ्यांपर्यत्न पोहचविता यावेत. अभ्यासासाठी पूरक असे उत्तम वातावरण निर्माण व्हावे यासाठी आपण चंद्रपूरात ५० लक्ष रुपयातून खुली अभ्यासिका तयार करणार असुन हा चंद्रपूरातील पहिला प्रयोग असणार आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

 

आमदार निधीतून वडगाव येथील नानाजी नगर येथे अभ्यासिकीचे इमारत बांधकाम करण्यात आले आहे. आज सदर ईमारतीचे आमदार किशोर जोरगेवर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी नगर सेवक पप्पू देशमूख यांची तर प्रमुख अतिथी म्हणून नवदत्त क्रीडा मंडळाचे अध्यक्ष हरिचंद्र येरगुडे, विनोद निखाडे, जनविकास युवा आघाडीचे अक्षय येरगुडे, जनविकास महिला आघाडी प्रमुख मनीषा बोबडे, सार्वजनिक दत्त मंदिराचे सचिव व्यंकटेश उपगन्लावार, बाळू पारखी, मनोज भैसारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ते पूढे म्हणाले की, केलेल्या संकल्पाची पुर्तता होते. तो आनंद मोठा असतो.

 

आमदार होताच चंद्रपूर मतदार संघात गरिब – गरजु विद्यार्थ्यांना निशुल्क अभ्यास करता यावा याकरिता 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प केला होता. तो पूर्ण होउ लागला आहे. आज आपण मतदार संघातील दुस-या अभ्यासिकेच्या इमारतीचे लोकार्पण करत आहोत. ही दत्त मंदिर येथील लोकार्पीत झालेली अभ्यासिकेची ईमारत शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात नक्कीच योगदान देणारी ठरेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

 

जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर मतदार संघाचा विकास होत आहे. हा विकास होत असताना समाजातील सर्व घटकांना स्पर्श करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागात आपण विकास पोहचवू शकलो आहे. महाविकास आघाडी सरकार आणि आता शिंदे- फडणविस सकरकार या दोनही काळात आपण विविध विभागातून मोठा निधी खेचून आणला आहे. या निधीतून विकासकामे करत असतांना मोठ्या इमारती, बगीचे बांधण्यावर आपण भर न देता लोकउपयोगी वास्तु उभारण्यावर लक्ष केंद्रीत केले. समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी आपण सामाजिक भवन उभारले आहे. हे सामाजिक भवन भविष्यात सांस्कृतीक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठी उपलब्ध असणार आहे.

 

तर कोरोणा काळात विद्यार्थ्यांवर कोसळलेल्या संकटात आपण विद्यार्थ्यांसाठी मतदार संघात 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प केला होता. यासाठी मोठ्या निधीची गरज होती. ती पूर्ण करतांना अनेक अडचणी आल्यात मात्र केलेला संकल्प पुर्ण करण्याचा निर्धार आपण केला होता. याचेच परिणाम स्वरुप आज आपण मतदार संघातील दुस-या अभ्यासिकेच्या ईमारतीचे लोकार्पण करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. आज इमारतीचे लोकार्पण झाले आहे. येथे पुस्तक व ईतर साहित्य खरेदीसाठी आपण आणखी निधी देणार असल्याचेही ते यावेळी बोलताना ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन संचालन रमा देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

किशोर जोरगेवार हे समाज उपयोगी सुचनांची तात्काळ दखल घेणारे आमदार – पप्पू देशमूख

आमदार किशोर जोरगेवार हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्यांना एखादी मागणी केली व ती लोकउपयोगी असली कि ते ती पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. आज येथे लोकार्पित झालेली अभ्यासिका याचाच प्रत्यय देणारी आहे. आपण त्यांना खुल्या अभ्यासिकेची मागणी केली ती ही समजून घेत त्यांनी यासाठी ५० लक्ष रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. एकंदरीतच किशोर जोरगेवार हे समाज उपयोगी सुचनांची तात्काळ दखल घेणारे कार्यक्षम आमदार असल्याचे यावेळी माजी नगरसेवक पप्पू देशमूख म्हणाले.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular