Thursday, February 29, 2024
Homeचंद्रपूरगोळ्या मारा पण मागणी मान्य होईपर्यंत माघार नाही, चंद्रपुरात विरुगिरी आंदोलन

गोळ्या मारा पण मागणी मान्य होईपर्यंत माघार नाही, चंद्रपुरात विरुगिरी आंदोलन

समान वेतनासाठी कामगारांचे विरुगिरी आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर: येथील मूल रोडवरील चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटमधील मागील २५ ते ३० वर्षांपासून कार्यरत स्थायी कर्मचाऱ्यांना औद्योगिक एस १ ग्रेड वेतन लागू करण्याचे न्यायालयाने आदेश दिले असतानाही कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही सुधारित वेतन लागू केले नाही. त्यामुळे एस-१ वेतनश्रेणी लागू व्हावी, यासाठी सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांनी कामगारांसह फेरो अलॉय प्लांटच्या बॉयलरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.

 

 

स्थायी कामगारांना एस-१ ग्रेड वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी कामगारांनी लढा उभारला होता. न्यायालयाने याबाबत तीन वेळा कामगारांच्या बाजूने निर्णय देत एस-१ वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश पारीत केले आहे. मात्र, फेरो अलॉय प्लांट व्यवस्थापन कामगारांना सुधारित वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांच्या नेतृत्वात सहसचिव माणिक सोयाम, कोषाध्यक्ष महादेव चिकटे, संघटक हेमलाल साहू, विनोद झामरे, मुसाफिर चौहान यांनी प्लांटच्या बॉयलरवर चढून आंदोलन सुरू केले.

 

चंद्रपूर फेरो अलॉय प्रबंधनाशी सम्पर्क करण्याचा प्रयत्न केला असता सम्पर्क झाला नाही, आंदोलन दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून आम आदमी पार्टीने त्याठिकाणी पोहचत कामगारांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

 

यावेळी आम् आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनिल मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार,युवा अध्यक्ष राजू कूडे,युवा महानगर अध्यक्ष संतोष बोपचे,शहर अध्यक्ष योगेश गोखरे,जयदेव देवगडे,शकर सरदार,पवन प्रसाद,दिपक बेरशेट्टीवार,योगेश मुरहेकर,अनुप तेलतुंबडे, सिकंदर सागोरे, सुनील सदभय्या,जितेंद्र कुमार भाटिया इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular