चंद्रपूर पोलीस दलातील श्रीमंताने मृत्यूला कवटाळलं

News34 chandrapur

राजुरा : शहरातील पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत तरुण पोलीस कॉन्स्टेबलने भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये सकाळी 11 वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव श्रीमंत कदम (वय- 32) असून ते राजुरा पोलीस स्थानकामध्ये कार्यत होते.

 

मयत कॉन्स्टेबल राजुरा पोलिस स्टेशनमध्ये मागील चार वर्षापासून कार्यरत होते. शहरातील चुनाभट्टी वॉर्डातील एका भाड्याच्या घरामध्ये मागील चार महिन्यांपासून एकटाच राहत होता. त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या मोठ्या भावाला सांगितले होते.

 

सकाळी दार उघडत नसल्याने त्यांच्या भावाला बोलाविण्यात आले मात्र भाऊ पोहचण्याअगोदरच त्याने घरातच गळफास घेतली होती. भाऊ आल्यानंतर दार काढून बघितले असता त्यांनी आपले जीवन संपविले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र पोलीस कॉन्स्टेबलच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या पश्च्यात पत्नी, दोन वर्षाची मुलगी, आई आणि भाऊ असा आप्त परिवार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!