चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट मधील कामगारांचे विरुगिरी आंदोलन मागे

News34 chandrapur

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील मूल रोडवरील चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटमधील मागील २५ ते ३० वर्षांपासून कार्यरत स्थायी कर्मचाऱ्यांना औद्योगिक एस १ ग्रेड वेतन लागू करण्याचे न्यायालयाने आदेश दिले असतानाही कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही सुधारित वेतन लागू केले नाही. त्यामुळे एस-१ वेतनश्रेणी लागू व्हावी, यासाठी सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांनी कामगारांसह फेरो अलॉय प्लांटच्या बॉयलरवर चढून 2 डिसेंम्बर ला आंदोलन सुरू केले होते.

2 डिसेंम्बर ला रात्री 10 वाजताच्या सुमारास प्रशासनाच्या मध्यस्तीने कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

 

स्थायी कामगारांना एस-१ ग्रेड वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी कामगारांनी लढा उभारला होता. न्यायालयाने याबाबत तीन वेळा कामगारांच्या बाजूने निर्णय देत एस-१ वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश पारीत केले आहे. मात्र, फेरो अलॉय प्लांट व्यवस्थापन कामगारांना सुधारित वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांच्या नेतृत्वात सहसचिव माणिक सोयाम, कोषाध्यक्ष महादेव चिकटे, संघटक हेमलाल साहू, विनोद झामरे, मुसाफिर चौहान यांनी प्लांटच्या बॉयलरवर चढून आंदोलन सुरू केले होते.

 

आम्हाला गोळ्या घाला मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली होती, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी कंपनी प्रबंधन, कामगार व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

 

रात्री 10 वाजता स्वतः सपोनि हर्षल एकरे हे बॉयलर वर चढले आणि कामगार व जिल्हाधिकारी यांच्यामध्ये संवाद घडवून आणला, जिल्हाधिकारी गौडा यांनी कामगारांना आंदोलन मागे घेण्यास विनंती करीत सोमवारी कंपनी प्रबंधन व कामगार या दोघांमध्ये बैठक घेत सुधारित वेतनाचा निर्णय लावू असे आश्वासन कामगारांना दिले असता जिल्हाधिकारी गौडा यांच्या विनंतीला मान देत कामगारांनी आपले विरुगिरी आंदोलन मागे घेतले.

 

सोमवारी बैठकीत काय तोडगा निघणार किंवा नाही त्यानंतर आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवू अशी प्रतिक्रिया आंदोलनकारी सूर्यकांत चांदेकर यांनी दिली.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!