उमा नदीच्या पात्रातुन भरमसाठ रेती उपसा

News34 chandrapur

चिमूर – (गुणवंत चटपकार)
चिमूर शहर व तालुक्याची जिवन वाहीनी असलेल्या उमा नदीचीचे पात्र रेती तस्करां करीता संजिवनी ठरली आहे. सोनेगाव सिरास गावा जवळील उमा नदीच्या घाटातुन मागील पंधरा दिवसा पासुन रात्रोच्या सुमारास रेतीचा उपसा करून रोज चिमूर व नेरी येथील पंचेविस ते तिस ट्रॅक्टर द्वारे तस्करी केल्या जात आहे.ज्यामुळे शासणाचा लाखो रूपयाचा महसुलास रेती तस्करांनी चुना लावलेला आहे.

चिमूर तालुक्यात सर्व पक्षीय रेती तस्करांकडून रेतीचा उपसा व वाहतुक करून बक्कळ पैसा कमविल्या जात आहे.या तस्करांना राजकिय व प्रशासकिय आधार मिळाल्याने त्यांची मुजोरी वाढली असुन सामान्य नागरीकांना कुणीही जुमानत नाही.

 

शेतकऱ्यांना,गावकऱ्यांना धमकावुन व प्रशासनाशी आर्थिक हितसंबध जोपासुन यांचा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरु आहे. चिमूर तालुक्यात उमा नदीच्या सोनेगाव सिरास जवळील पात्रात स्थळावर मोठ्या प्रमाणात रेती आहे.हे सर्व हेरून चिमूर नेरी येथील रेती तस्कर सामुहिक पणे या पात्रातुन अवैध रेती उत्खनन व वाहतुक करीत आहेत.ज्यामुळे पात्रात जवळपास पाच फुटावर खड्डे पडलेले आहेत.हि रेती तस्करी रोज रात्रो पहाटे पाच वाजे पर्यंत केल्या जाते.

 

अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्या साठी निर्माण करण्यात आलेल्या पांदण रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात दुचाकीने जाताना जिव मुठीत घेऊन जावे लागते. अनेक शेतकरी यावरून मार्गक्रमण करताना पडले आहेत.मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या रेती तस्करीकडे महसुल विभाग जाणीव पुर्वक दुर्लक्ष करतात कि त्यांना माहीती नसते हा गंभीर प्रश्न आहे.या घाटातुन करण्यात आलेल्या रेती उपसा संबधी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी यांना माहीती देण्यात आली असुन या रेती तस्करावर कोणती कार्यवाही होईल याकडे नागरीकांचे लक्ष लागलेले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!