ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा 6 वा दिवस, आंदोलकाची प्रकृती खालावली

News34 chandrapur

चिमूर – ओबीसींच्या न्यायिक मागंन्यासाठी दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून चिमूर क्रांती भूमीत अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात अक्षय लांजेवार व अजित सूकारे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले. आज दिनांक 12 डिसेंबरला उपोषणाच्या सहाव्या दिवशी अक्षय लांजेवार यांची प्रकुरती खालावली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

 

चंद्रपूर येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनात राज्य सरकारने आश्वासन देऊन सुधा मागण्या पूर्ण नाही केल्यामुळे चिमूर क्रांती भूमीतून अन्नत्याग आंदोलनाला 7 डिसेंबर पासून सुरुवात झाली. चिमूर येथील दोन युवक अजित सुकारे व अक्षय लांजेवार यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आज उपोषणाचा सहावा दिवशी अक्षय लांजेवार यांची तब्बेत अचानक खालावली. वैदकिय अधिकारी डॉ गायधनी यांनी अक्षय लांजेवार याना तपासणी करून उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

 

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर, नामदेव किरसान, सूर्यकांत खनके यांनी दवाखान्यात भेट दिली. उपोषणाला सहा दिवस झाले असून सुधा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी की विरोधी पक्ष ओबीसींच्या न्यायिक मागण्याची दखल घेत नसल्याने ओबीसी समाजात तीव्र आक्रोश निर्माण होताना दिसत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!