Thursday, June 20, 2024
Homeक्रीडाहिवाळी अधिवेशनात गाजला चंद्रपूर महाकाली मंदिराच्या विकासाचा मुद्दा

हिवाळी अधिवेशनात गाजला चंद्रपूर महाकाली मंदिराच्या विकासाचा मुद्दा

आमदार किशोर जोरगेवार यांनी हिवाळी अधिवेशनात केली मागणी

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या विकासासाठी 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. असच एक शक्तीपीठ माता महाकालीच मंदिर चंद्रपूरात असुन या मंदिराच्या विकासासाठी शासनाने पूढाकार घ्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून मंदिराच्या विकासकामात अडथळा असलेल्या पूरातत्व विभागाच्या जाचक अटींकडेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

 

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी पूरवणी मागणीवर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी पून्हा एकदा माता महाकाली मंदिराच्या विकासाचा मुद्दा सभागृहात उचलला. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूरात माता महाकाली मंदिराचे 500 वर्ष पूरातन मंदिर आहे. तर 2 हजार वर्षा पुर्वीची येथे माता महाकालीची मुर्ती आहे.

 

या शक्तीपीठात चंद्रपूर नव्हे तर देशभरातून वर्षभर लाखो भाविक दर्शनाला येत असतात. मात्र पूरातत्व विभागाच्या अटिमुळे या मंदिराचा विकास झालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने दिलेले 59 कोटी रुपये अखर्चित आहे. पैसे असुनही केवळ पूरातत्व विभागाच्या जाचक अटिंमुळे या मंदिराच्या विकासकामात अडथळा निर्माण होत असल्याचे ते यावेळी म्हणाले. सोबतच महाकाली यात्रा परिसरात अनेक मोकळ्या जागा आहेत मुख्यमंत्री यांनी स्वतंत्र बैठक घेत हा यात्रा परिसर विकसित करावा अशी मागणी यावेळी बोलतांना त्यांनी केली.

 

महानगर पालिका आणि नगर पालीका क्षेत्रात पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी 700 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या विभागातून चंद्रपूर महानगर पालिका आणि नवनिर्मित घुग्घूस नगर परिषद साठी शासनाने निधी दयावा तसेच वैशिष्टपूर्ण विभागात दोनशे कोटी रुपयांना निधी आहे. यातुनही चंद्रपूरच्या विकासासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे.
नागपूर करीता अतिवृष्टीसाठी सरकारने 100 कोटी रुपये राखीव केले आहे. चंद्रपूरातही अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे येथे चारदा पूर आला परिणामी अनेक भागातील पायाभूत सुविधा पूर्णपणे खराब झाल्यात त्यामुळे चंद्रपूरात सुद्धा आपण निधी द्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

पदांची भरती करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरात मंजूर झाले आहे. या विद्यालयाची इमारत तयार होत आहे. सध्या सदर मेडीकल कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात पदभरती करुन ते नव्या इमारतीत सुरु करण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!