News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हयाची दारूबंदी हटल्यावर जिल्ह्यात नियमबाह्य दारू दुकानांना परवानगी देण्यात आली होती, आधीच्या तुलनेत सध्या दुप्पट दारू दुकानांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र आजही दारू दुकान मालक प्रशासनाने दिलेल्या वेळेचे पालन करीत नाही.
त्यामुळे शासनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या दारू दुकानासमोर मी भजन आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे चंद्रपूर शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी दिला आहे.
सध्या शहरात दारू दुकानात राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइन बार सुरू करण्याची वेळ सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरा मात्र ही वेळ दारू दुकान मालक पाळत नाही, त्यामुळे हे तात्काळ कुठेतरी थांबायला हवं यासाठी राहुल देवतळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग सहित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्यमंत्री याना निवेदन दिले जर त्यानंतर दारू दुकान मालकांनी वेळेचे नियम पाळले नाही तर आम्ही राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे दारू दुकानासमोर भजन आंदोलन करू असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या निवेदनात देवतळे यांनी दिला आहे.