News34 chandrapur
चंद्रपूर – ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर ओळखल्या जाते, जिल्ह्यात कोल इंडियाच्या अनेक खाणी आहे मात्र या खाणीतून निघणारा कोळस्याचा झोल मोठया प्रमाणात सुरू असतो.
चंद्रपुरातील वेकोली अधिकारी व कोळसा पुरवठादार यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे, या क्लिप मध्ये टक्केवारी बाबत बोलणे सुरू आहे, मात्र वेकोली अधिकारी त्या पुरवठादार याला जे बोलायचे आहे ते कार्यालयात येऊन बोला असे सांगत आहे, कारण विषय अर्थकारणाचा आहे, ती टक्केवारी खालून ते वर पर्यंत जात असल्याने वेकोली अधिकाऱ्याला सावधगिरीचा भाग म्हणून पुरवठादार याला कार्यालयात बोलवावे लागले.
आपण विचारात पडला असेल की हा अधिकारी आहे तरी कोण? चंद्रपूर वेकोली क्षेत्रात असे अनेक प्रकार आजपर्यंत घडले मात्र सदर ऑडिओ क्लिप मूळे टक्केवारी चे काय घबाड असे ते यामुळे बाहेर पडले आहे. याबाबत चौकशी झाल्यास तो टक्केवारी मागणारा अधिकारी कोण आहे हे नक्की कळेल.