चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू

News34 chandrapur

(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही- ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीटातील मेंढा चक, येथील एका खासगी शेत शिवारात गट क्रमांक. १६४ मध्ये एक वाघ आज सकाळी शेताकडे गेलेल्या एका शेतकऱ्याला मृत अवस्थेत दिसून आला घटनास्थळी तोंडाला विद्युत करंट लागून वाघ मेल्याचे निदर्शनास आले मृत वाघाचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे असून नर वाघ आहे.

 

त्यावेळेस मोक्का पंचनामाच्या वेळी घटनास्थळी वन्यजीव प्रेमी यश कायरकर स्वाब नेचर केअर फाउंडेशन, बंडू धोत्रे एनटीसीए प्रतिनिधी, विवेक करंबेकर मानद वन्यजीव संरक्षक ब्रह्मपुरी, पंकज माकोडे नेचर एनवोर्मेन्ट अँड वाईल्डलाईफ ऑर्गनायझेशन ब्रम्हपुरी, यांच्या उपस्थित मध्ये मोक्का पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता शिंदेवाही वन विभागाच्या लकडा डेपोमध्ये नेण्यात आले व बातमी लिहे पर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती.

 

शव विच्छेदन डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा, डॉ.शालिनी लोंढे पशुधन विकास अधिकारी शिंदेवाही, डॉ. सुरपाम पशुवैद्यकीय अधिकारी सिंदेवाही, यांनी केले समोरील तपास सहाय्यक उपवनसंरक्षक चोपडे, यांचे मार्गदर्शनात विशाल सालकर वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही हे करीत याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली अशी माहिती आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!