News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूरात 17 डिसेंम्बरला शिवसेनेचे पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव पक्षाच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिले.
गडचिरोली दौरा आटोपताच सायंकाळी जाधव चंद्रपुरात पोहचले, शहरातील मातोश्री विद्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्याला जाधव यांनी मार्गदर्शन करीत शिवसेना-भाजप युतीचा इतिहास सांगितला, वर्ष 86-87 मध्ये जेव्हा युती झाली त्यावेळी भाजपला राज्यात कुणी ओळखत नव्हतं त्यासाठी शिवसैनिक राबला, आज भाजप दिल्लीच्या तखतवर बसला आहे ते फक्त शिवसेनेमुळे, शिवसैनिक नसता तर राज्यात तुमची बिकट परिस्थिती असती मात्र भाजपने आपला शब्द पाळला नाही त्यामुळे ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी-कांग्रेस पक्षासोबत युती करीत सत्ता स्थापन केली पण आपल्या गद्दारानी भाजप सोबत जात ठाकरे साहेबांना धक्का दिला, ते म्हणतात की तुम्ही राष्ट्रवादि व कांग्रेस सोबत गेलात म्हणून आम्ही वेगळे झालो मात्र अडीच वर्षे मंत्रिपद घेताना या गद्दाराना लाज वाटली नाही.
कार्यक्रमापूर्वी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या भव्य बाईक रॅली ने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले, सदर बाईक रॅली शहराचे भ्रमण करीत मातोश्री विद्यालयात कार्यक्रम स्थळी दाखल झाली.
आयोजित कार्यक्रमात जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, मुकेश जीवतोडे, युवासेना विभागीय सचिव, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, युवासेना सरचिटणीस रोहिणी पाटील, जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, महिला जिल्हाप्रमुख उज्वला नलगे, प्रमोद पाटील, सुरेश पचारे आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.