Friday, March 1, 2024
Homeगुन्हेगारीनववर्षाच्या पूर्व संध्येला विजासन लेणी येथे घडला धक्कादायक प्रकार

नववर्षाच्या पूर्व संध्येला विजासन लेणी येथे घडला धक्कादायक प्रकार

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली ही मागणी

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : भद्रावती येथील ऐतिहासिक विजासन लेणी येथे भगवान गौतम बुध्दाच्या प्राचीन मुर्ती आहेत. यापैकी वरील भागात असलेल्या एका मुर्तीला दि. 31 डिसेंबर 2023 चे रात्रीतून अज्ञातांनी भग्न करुन विटंबना केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

या प्रकरणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना पत्र लिहून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रात धानोरकर यांनी म्हटले आहे की, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील नागरिक शांतताप्रिय, जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्थेला सहकार्य करणारे आहेत. परंतु अशा प्रकारच्या घटनांमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात त्वरित कारवाई करून दोषींना अटक करणे आवश्यक आहे.

 

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पोलिस प्रशासनाला तात्काळ दोषींना अटक करण्याची विनंती केली आहे. अन्यथा भद्रावती तालुका काँग्रेस रस्त्यावर उतरुन न्यायासाठी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular