Thursday, February 29, 2024
Homeचंद्रपूरचंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौकात वाहनचालकांचे चक्काजाम आंदोलन

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौकात वाहनचालकांचे चक्काजाम आंदोलन

काळा कायदा परत घ्या, वाहन चालक संघटना आक्रमक

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : जडवाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहनचालकांसाठी अन्याय कारक ठरणारा सुधारित हिट ॲण्ड रन कायदा तत्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार २ जानेवारी रोजी बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन आले.

नुकताच संसदेत जुन्या हिट ॲण्ड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारीत करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून, वाहनचालकांसाठी अन्यायकारक आहे. यात कारावासाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे.अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात. मात्र, या अपघातात वाहनचालकांनाच जबाबदार धरले जातात.

 

अनेकदा अपघातानंतर वाहनचालकांना गंभीर मारहाणही केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जखमीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलीस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु, नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार २ जानेवारीला बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

 

सकाळी 11 वाजता बंगाली कॅम्प चौकात असंख्य वाहन चालक संघटनेचे सदस्य व पदाधिकारी एकत्र आले, त्यांनतर मूल मार्गे चंद्रपुरात येणाऱ्या वाहनांची वाहतूक वाहन चालकांनी थांबवित आंदोलन सुरू केले, यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता, जोपर्यंत हा काळा कायदा परत घेणार नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण देशात असेच आंदोलन करणार असा इशारा वाहन चालकांनी यावेळी दिला.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular