News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कोळसा वनपरिक्षेत्रात सकाळी 2 वाघांचे मृतदेह आढळून आले, आतापर्यंत या महिन्यात तब्बल 4 वाघांचा मृत्यू तर 1 बिबट चा मृत्यू झाला.
यामध्ये 1 बोर्डा,1 भद्रावती तर 2 कोळसा येथे वाघांचे मृत्यू झाले आहे.
राज्यात सर्वाधिक जास्त संख्या असलेल्या वाघाचा जिल्हा म्हणून ताडोबा अभयारण्य याचं नाव येत, मात्र या ताडोब्यात वाघाला अधिवास क्षेत्र कमी पडत आहे, त्यामुळे वाघांच्या झुंजी वाढत आहे.
कोळसा वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र झरी पाणघाट खातोडा तलाव क्षेत्रात आज सकाळी वनरक्षक गस्त करायला गेले असता त्यांना 2 वाघांचे मृतदेह त्याठिकाणी आढळून आले.
2 वाघाचा मृत्यू हा झुंजीत झाला असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे, पूर्णपणे शाबूत असलेला वाघ हा T-142 नर असून त्याचे अंदाजे वय 6 ते 7 वर्षे आहे.
दुसरा वाघ हा कमी वयाचा असून त्या वाघांचे अंशतः मास भक्ष्य केले आहे, दुसरा वाघ हा T-92 या वाघिणीचा मादी बच्चा आहे, त्याच वय हे अंदाजे 2 वर्षे आहे.
दिनांक 20 जानेवारी ते 21 जानेवारीला रात्रीच्या दरम्यान वाघांची झुंज झाली असावी असा अंदाज आहे, सदरील वाघांचे मृतदेह TTC सेंटर येथे शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले असून 23 जानेवारीला मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार.
दोन्ही वाघांचे DNA नमुने सुद्धा घेण्यात आले आहे, मोका पंचनामा करतेवेळी कोर चे उपसंचालक नंदकिशोर काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी वृंदन कातकर, बंडू धोत्रे, मुकेश भांदककर, डॉ खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.