News34 chandrapur
चंद्रपूर – जिल्ह्यातील राजुरा येथील आसिफाबाद मार्गावरील साईकृपा पेट्रोल पंपावर 6 जानेवारी ला पहाटे 3 वाजता सशस्त्र दरोडा पडला, या मध्ये दरोडेखोरांनी तब्बल 1 लाख 90 हजार रुपये लुटले. मात्र चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज तपासात दरोडेखोरांना अवघ्या काही तासात अटक करण्यात आली.
राजुरा तालुक्यात मागील वर्षी पेट्रोल पंपावर दरोड्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले होते, मात्र नव्या वर्षात 6 जानेवारीला 5 जणांनी चेहऱ्यावर कपडा गुंडाळत राजुरा-आसिफाबाद मार्गावरील साई कृपा पेट्रोल पंपावर धडक दिली, त्याठिकाणी असलेल्या मॅनेजर ला बंदूक व कोयता दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याजवळून पेट्रोल पंपाचे 1 लाख 90 हजार रुपये लुटत तिथून पोबारा काढला.
घटनेनंतर विरुर पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार देण्यात आली, जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी तात्काळ हे प्रकरण चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी घटनेचे गांभीर्य बघत पथक तयार करीत तपास सुरू केला.
पोलीस निरीक्षक कोंडावार यांच्या जलद तपासाने 5 दरोडेखोरांना अटक करण्यात आली, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आले.
नव्या वर्षात स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज तपासाचे पोलीस अधीक्षकांनी सुद्धा कौतुक केले आहे.