News34 chandrapur
चंद्रपूर/बल्लारपूर – क्षुल्लक वाद हा कधी मोठ्या गुन्ह्याचं कारण ठरणार हे सांगता येत नाही मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विसापूर येथे असाच एक जुना वाद उफाळला आणि त्या वादात एकाची हत्या झाली.
23 जानेवारीला विसापूर येथील 40 वर्षीय सचिन वंगणे याची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने पोटावर वार करीत हत्या करण्यात केली, याबाबत मृतकाच्या भावाने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, बल्लारपूर पोलिसांनी कलम 302, 452 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी गुन्ह्याची गंभीरता बघता तात्काळ हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याचे आदेश दिले, बल्लारपूर पोलीस व चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त तपास करीत 2 पथक तयार केले. सचिन ची हत्या करणारा त्याचा शेजारी 37 वर्षीय विठ्ठल उर्फ डेंनी डबरे निघाला. पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आत अटक केली.
प्रकरण नेमकं काय होत?
सचिन व विठ्ठल यामध्ये जुना वाद होता, जेव्हा जेव्हा मृतक सचिन ला विठ्ठल दिसायचा त्यावेळी थांब तुझा गेम करतो अशी धमकी सचिन हा विठ्ठल ला द्यायचा, असं अनेकदा घडले, घटनेच्या दिवशी सुद्धा सचिन याने विठ्ठल ला धमकी देत तू इथेच थांब आज तुझा गेम करतो अशी धमकी देत घरून चाकू आणला, दोघांचा वाद झाला त्यानंतर विठ्ठल ने त्या चाकूने उलट सचिन वर वार केला, यामध्ये सचिन याचा जागीच मृत्यू झाला.
असा मिळाला आरोपी
सचिन ची हत्या केल्यावर आरोपी विठ्ठल ने पळ काढला नाही तो निवांत घरी होता, गावात अनेकांना माहीत होतं की विठ्ठल आणि सचिन या दोघांचा वाद सुरू होता, मात्र त्यावर कुणी बोलायला तयार नव्हते, विशेष म्हणजे पोलिसांनी विठठल ला संदेहाच्या आधारे चौकशीसाठी बोलावले होते, स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहिती काढत या खुनाचा उलगडा केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस निरीक्षक उमेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि रमेश तळी, सपोनि विकास गायकवाड, सपोनि प्राची राजूरकर, पोउपनी वर्षा नैताम, रणविजय ठाकूर, यशवंत कुमरे, बाबा नैताम, संतोष दांडेवार, अनुप डांगे, मिलिंद चव्हाण, जमिर पठाण, नितेश महात्मे, श्रीनिवास वाभीटकर, प्रसनजीत डोरलीकर, प्रकाश मडावी व प्रसाद धुलगंडे यांनी केली.