वाळू चोरीचा नवा फंडा

News34 chandrapur

गुरू गुरनुले

मूल – अवैध रेती उत्खनन व विक्रीची सवय जडलेल्या रेती तस्करांना येन केन प्रकारे चोरी केल्याशिवाय चैन पडताना दिसत नाही.

 

रेती घाट लिलाव मोहीम लांबणीवर गेली मात्र उसंत नसलेल्या रेती चोरांनी बैलबंडीचा फंडा वापरुन आपला गोरखधंदा सुरुच ठेवला आहे. तालुक्याबाहेर रेती जात नसली तरी बैलबंडया भाडयाने घेऊन शहरीभागात खूलेआम, बेभाव रेती पुरवून लुटमार सुरु असल्याचे चित्र दिसून येते. बैलबंडया वापरल्याने महसूल अधिकाऱ्यांची कटकट नाही. हा फंडा वापरुन मूल तालुक्यात दररोज शेकडो ब्रास रेती रेतीचोर काही ठिकाणी घरपोच तर काही ठिकाणी साठवणूक करीत असल्याची बोंब सुरू आहे.

 

मूल तालुक्यात प्रस्थावित असलेल्या ९ रेती घाटांचा लिलाव प्रलंबित आहे. लिलावाअभावी परवाना
अभावी ट्रॅक्टर द्धारे रेतीघाट वाहतुक बंद आहे. मात्रं खाजगी बांधकामांसाठी रेती ची मोठी मागणी सुरू आहे. याचाच फायदा घेत शहरातील काही रेती तस्करांनी बैलबंडया भाडयाने घेऊन बेभाव रेतीतस्करी सुरू केली आहे. मुल तालुक्यात प्रति बंडी ९०० रुपयावर रेती पुरविणे सुरू असल्याची चर्चा आहे. दररोज मोठ्या संख्येने बैलबंडीधारक तालुक्यातील अनेक घाटांवर उपसा करताना खूलेआम दिसतात. तालुक्यातील अनेक गावांमधून पहाटे व रात्रो रेती भरलेल्या बैलबंडयाचा लोंढा बघून रेतीचोर किती शातीर होऊन आपला फंडा चालवीत आहेत हे लक्षात येत आहे.

 

गतवषीं सुदधा असाच प्रकार सुरु असताना महसूल अधिकाऱ्यांनी बैलबंडीधारकाना वेठीस धरले होते मात्र काही राजकिय व्यक्ती यात हस्तेक्षेप करीत असल्याची चर्चा होती. बैलबंडीधारकांना काही ठरावीक
रक्कम एका फेरीमागे देऊन तेवढीच रक्कम या रेती चोरांच्या घशात जात असल्याचे बोलल्या जाते.

 

मूल तालुक्यात दिवसाकाठी शेकडो ब़ास रेतीचे अवैध उपसा सुरू असून यात शेकडो बैलबंडीधारकांना फुस लावून गुंतविण्यात आल्याचे कळते. सकाळी ६ ते ७ व सायंकाळी ६ ते ७ चे दरम्यान मुल शहरात सुद्धा रेती वाहतुक करणाऱ्या बंडीच्या टोळया हमखास आढळून येतात असे बोलले जाते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!