News34 chandrapur
चंद्रपूर – जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन चंद्रपुरातील सिटी शाळेत 28 जानेवारीला करण्यात आले आहे.या शिबिराचे सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. Health camp chandrapur
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांचेसह भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार होते.
महाआरोग्य शिबिरात सकाळी 9 वाजतापासून विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांनी आपली नोंदणी केली, त्यानंतर नागरिकांची आरोग्य तपासणी सावंगी मेघे मधून आलेल्या तज्ञ डॉक्टरांनी केली. Savangi meghe
कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी उपस्थित नागरिकांना आरोग्य ही सेवा म्हणून करण्याचा आम्ही संकल्प केला आहे, काही महिन्यात चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयाची इमारतिमध्ये आपल्याला चांगला उपचार मिळेल अशी व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आली आहे.
आपल्या शरीरात विविध आजार घर करू लागले आहे, कारण आपण आपल्या जीवनशैलीत अनेक बदल केले आहे, आईच्या हातचं जेवण सोडत आपण ऑनलाइन हॉटेलमधील जेवण करायला लागलो आहे, त्यामुळे विविध आजाराला सुद्धा आपण यासोबत आमंत्रण देत आहोत, सध्या कॅन्सर चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे, मात्र आपण यावर उपचार करणे शक्य होईल यासाठी आपन किमोथेरपी ची मोफत व्यवस्था केली आहे.
आयोजित महाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी यावेळी लाभ घेतला.