Chandrapur strike march : लॉयड्स मेटल कंपनीवर धडकला भव्य मोर्चा

News34 chandrapur

चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे १००० हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते.आंदोलकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला आणि आंदोलन सुरू ठेवले आहे. पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाचे आदेश दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी त्यास विरोध केला.

 

या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश चोखारे यांनी केले. या मोर्चात कंपनीकडून स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवकांना नोकरी देणे, कंपनीच्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान भरपाई देणे, कंपनीच्या CSR फंडाचा योग्य वापर करणे, कंपनीच्या अतिक्रमण हटवणे, कंपनीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देणे, कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करणे, स्थानिक महिला बचत गटांना कंपनीच्या CSR फंडाच्या माध्यमातून घरेलू उद्योगाकरिता प्राधान्य देणे आदी मागण्या करण्यात आल्या.

 

आंदोलकांनी चेतावणी दिली की, जर कंपनीने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ते आणखी तीव्र आंदोलन करण्यास तयार आहेत.

 

 

यावेळी आयोजक माजी सदस्य ग्रामपंचायत घुघुस पवन अगदारी, सुधाकर बांदुरकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत घुघुस, हेमंत उरकुडे, शेखर तंगडपल्ली, प्रेमानंद जोगी, लखन हिकरे, तोफिक शेख, सुरज बहुराशी, सिनू गुडुला,
सुधाकर बांदुरकर, हेमंत उरकुडे, म्हातरदेवी सरपंच संध्याताई पाटील, पंचायत समिती सदस्य रजीता पवनकुमार आगदरी, पवन चांकपुरे, दिलीप ठाकरे, दिलीप मत्ते, बबन सावे, अमोल आत्राम, शंकर उईके, तुळशीराम दरेकर, सुरज बहुरिया, साखरवाही सरपंच नागेश बोंडे, घोनाडच्या सरपंच संगीता मत्ते, गणेश आवारी, संजय टिपले, दिनेश टिपले, हसिम खान, संतोष बांदुरकर, हितेश लोडे, दिनेश भोगले, भास्कर सोनेकर, सुधाकर वारारकर, रमेश काळे, श्यामराव उपरे, यांचे सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

या मागण्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

* घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवक व युवतींना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीत सामावून घेणे.
* लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे.

 

* लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो, म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कंपन्यांवर कारवाई करणे.

 

* लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घुग्घूस ते पांढरकवडा पांदन रस्ता आणि घुग्घूस ते सेनगाव पांदन रस्तावर केलेला अतिक्रमण हटवणे.

 

* लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने शहर व ग्रामीण भागात सन २०१३ पासून ते आजपर्यंत CSR फंडातून केलेल्या खर्चाची कार्याची चौकशी करणे.
* जिल्ह्याधिकारी यांनी सदर लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करणे.
* विस्तारीकरणात ज्या शेतकऱ्याच्या जमिनी कंपनी अधिग्रहित करते त्या जमिनींचा मोबदला हा शेतकऱ्यांना थेट मिळावा.

 

* कंपनीचे अधिकारी यांनी विस्तारीकरणाच्या जनसुनानीच्या नोटिफिकेशनमध्ये जाहीरपणे सांगितले की कंपनीच्या परिसरात किमान दोन लाख वृक्षारोपण करण्यात आले असे खोटे व चुकीची माहिती सादर केलेल्या कंपनीवर कडक कारवाई करणे.
* प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि त्यांना योग्य पगार किमान ₹२०,००० ते ₹२५,००० रुपये देण्यात यावे.

 

* कंपनीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी अनेक लोकवस्तीचे पुनर्वासन करताना सर्वे क्रमांक १६७ आराजी ६३.६७३७ चौ.मी. एकूण ६२ प्लॉट रहिवासा करिता पुरावतीत आहे. जमिनीचे पट्टे देऊ असे खोटे आश्वासन कंपनी मार्फत देऊन त्या लोकवस्तीना स्थलांतरित करण्यात आले.

 

* लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून होत असल्याने दुर्घटनाला आमंत्रण नाकारता येत नाही. म्हणून कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करण्यात यावे.

 

* स्थानिक महिला बचत गटांना कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून घरेलू उद्योगाकरिता प्राधान्य द्यावे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!