Monday, February 26, 2024
Homeगुन्हेगारीShiva Wazarkar Murder : शिवा वझरकर च्या मारेकऱ्यांवर मोक्का लावा - सर्वपक्षीय...

Shiva Wazarkar Murder : शिवा वझरकर च्या मारेकऱ्यांवर मोक्का लावा – सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात शिवा वझरकर ला सर्वपक्षीय नेत्यांनी दिली श्रद्धांजली

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – 25 जानेवारीला शहरातील सरकारनगर भागात ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपीना अटक केली होती.

 

त्यानंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 28 जानेवारीला वझरकर कुटुंबाची भेट घेतली होती, त्यावेळी वझरकर कुटुंबानी आरोपीवर मोक्का लावण्याची मागणी केली, यावर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

 

आज प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात स्व.शिवा वझरकर याना सर्वपक्षीय श्रद्धांजली देण्यात आले, हजारो युवकांनी यावेळी शिवाच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती पेटवत श्रद्धांजली दिली.

 

यावेळी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी माहिती दिली की आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही अधिक तीव्र आंदोलन करणार, आज आम्ही शांत पध्दतीने आंदोलन करीत आहो जर प्रशासनाने आमच्या मागणीवर दुर्लक्ष केले तर आम्ही चंद्रपूर जिल्हा बंद पाडू असा इशारा गिर्हे यांनी यावेळी दिला.

 

 

आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, कांग्रेस इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, शिंदे गट शिवसेना महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर, महानगरप्रमुख भरत गुप्ता आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular