रस्ता ओलांडताना 2 चितळांना अज्ञात वाहनाने दिली धडक

Marathi News

(प्रशांत गेडाम)
नागभीड : ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड वन परिक्षेत्रातील चिधीमाल जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन चितळ ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. दोन्ही मृत चितळ नर आहेत. एक दोन तर दुसरा चार वर्ष वयाचा आहे.

 

अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर हे दोन्ही चितळ जवळच शेतात पडले. सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सहाय्यक वनसंरक्षक सुनील हजारे सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

 

मोका पंचनामा करून दोन्ही चितळांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन नागभीडच्या पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. ममता वानखेडे यांनी केले.

 

यावेळी क्षेत्र सहायक नेरलावार, वनरक्षक कुळमेथे, वनरक्षक कुथे, स्वाब नेचर केअर संस्थेचे यश कायरकर, जिवेश सयाम, महेश बोरकर, गणेश गुरनुले, विकास लोणबले, अमन करकाडे तथा वन मजूर आदि उपस्थित होते.

 

सदरील अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक व संरक्षक एस. बी. हजारे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!