Marathi news
चंद्रपूर : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षणमुखानंद सभागृह येथे प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी महिला निर्धार मेळावा आयोजित केला आहे.
सदर मेळाव्यात मा. अजितदादा पवार साहेब, प्रफुल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली ताई चाकणकर यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण मंत्री व जेष्ठ नेते उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी जिल्हाध्यक्षा रंजनाताई पारशिवे, कार्याध्यक्षा अर्चना ताई बुटले तथा शहर जिल्हाध्यक्षा चारुशीला ताई बारसागडे यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात मुंबई करिता रवाना झाल्या आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपस्थितीत मुंबई जाणाऱ्या वाहनांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा दाखवून बसेस मुंबई करिता रवाना करण्यात आल्या. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा रंजनाताई पारशिवे, कार्याध्यक्षा अर्चनाताई बुटले, शहर कार्याध्यक्षा चारुशीला ताई बारसागडे, वरोरा तालुका अध्यक्ष रवि भोयर, शहर अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे यांचासह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.