Marathi News
गुरू गुरनुले
मुल – शिक्षकांच्या घरी युवक पाहुणा म्हणून आला आणि चोरी करून निघून गेला, ही घटना आहे मूल शहरातील वार्ड क्रमांक 14 मधील, राजू जगन चिकाटे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
13 जानेवारीला चिकाटे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, त्याचं दिवशी त्यांचा चामोर्शी तालुक्यातील वायगाव येथे राहणारा स्नेहल देवगडे हा नातेवाईक घरी आला मात्र घरी कुणी नसल्याने स्नेहल ने घराच्या मागील बाजूने आत प्रवेश केला. व चिकाटे यांच्या घरी चोरी केली.
ज्यावेळी शिक्षक चिकाटे घरी आले त्यावेळी घरातील सामान अस्तव्यस्त आढळले, आपल्या घरी चोरी झाल्याचे समजताच त्यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली, मूल पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता 16 जानेवारीला पाहुणा म्हणून चिकाटे यांच्या घरी आलेला स्नेहल चं चोर निघाला, पोलिसांनी स्नेहल देवगडे ला अटक केली. व चोरी केलेला माल स्नेहल कडून जप्त करण्यात आला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.