News34 chandrapur
चंद्रपूर – सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या येथे प्रभु रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिका पटांगणात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 11 प्रकारच्या भातांचा महाप्रसाद नागरिकांमध्ये वितरित करण्यात आला.
यंग चांदा ब्रिगडचे संस्थापक अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने महानगर पालिकेच्या पटांगणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8.00 वाजता पासून भव्य एलईडी स्क्रीन वर अयोध्या मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नागरिकांना दाखविण्यात आले.
सकाळी 8.30 वाजता लखमापूर भजन मंडळाच्या वतीने सुंदरकांड चे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 1 वाजेपासून संस्कार टिव्ही फेम भजन सम्राट दिनेशजी शर्मा याच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा भात उत्पादक जिल्हा असल्याने 11 प्रकारच्या भातांचे महाप्रसाद नागरिकांमध्ये वितरीत केल्या गेले.
आपल्या विविध कार्यक्रमात नेहमी वेगळेपण जपण्याचा आमदार जोरगेवार हे प्रयत्न करीत असतात यावेळी त्यांनी भात उत्पादक जिल्ह्यातील विविध 11 प्रकारच्या भाताचा महाप्रसाद नागरिकांमध्ये वितरित केल्याने नागरिकांना सुद्धा भाताच्या विविध जातीबद्दल माहिती मिळाली.